ठाणे विशाल सावंत-कोविड १९ काळात अनेक मराठी चित्रपट निमति,कलाकार व तंत्रज्ञ आर्थिक संकटात सापडल्याने त्यांचे चित्रपट पूर्ण होवून वितरित होऊ शकले नाहीत आणि कोणतेही शासकीय आधार मिळाला नाही.ही असुरक्षितता मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे.हेच मानसिक विकलांग होण्याचे द्योतक आहे म्हणून कोरोना काळात चित्रपट निर्माण केलेल्या मराठी निर्मात्यांना, प्रती चित्रपट किमान २० लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी,अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी सांस्कृतिक मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
सांस्कृतिक मंत्र्याकडे मराठी चित्रपटसृष्टीतील होतकरू,निर्माता संघाची मागणी
मेहनती दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी याच नैराश्यातूनआत्महत्या केली,त्यांच्या डोळ्यांत असंख्य स्वप्नं होती-मराठी सिनेमा मोठा करण्याची जिद्द होती. पण परिस्थितीच्या ओझ्याने त्यांच्या स्वप्नांचा अंत झाल्याची खंत मोरे यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.शासनाच्यावतीने देण्यात येणारा मदत निधी भविष्यातील आत्महत्या टाळण्यासाठी जीवनरेषा ठरेल आणि शासन खऱ्या अर्थाने सांस्कृतिक सहवेदना दाखवतं आहे, हे सिद्ध
होईल, असे मत त्यांनी पत्रात व्यक्त केले आहे. दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी शनिवारी नागपूर येथील एका मठात आत्महत्या केली.उबाळे हे मुळचे नागपूरचे.ते मुंबईत वास्तव्यास होते. त्यांनी श. ना. नवरे यांच्या कथांवर आधारित मालिकेचे दिग्दर्शन केले होते.गजरा,अग्नी, एका श्वासाचे अंतर, किमयागार, चक्रव्यूह अशा अनेक मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांच्या गार्गी हा चित्रपट कार्ल्सबग येथील चित्रपटात महोत्सवात दाखविण्यात आला. मात्र त्यांचा हा गार्गी आणि आनंदाचे डोही हे चित्रपट प्रदर्शित न झाल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या केली.