नाशिक दिनकर गायकवाड- ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल व विर जवानांच्या सन्मानार्थ "तिरंगा यात्रा" व माजी सैनिक, हुतात्मा जवानांच्या पत्नींच्या(वीर नारी) उपस्थितीत सुहासिनीनींनी आणलेल्या "चिमूटभर कुंकवाचं पूजन" कार्यक्रमाचे मखमलाबाद मध्ये नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
माजी सैनिक नागरिकाचा सहपरिवार बाईक रॅली मध्ये सहभागी झाले होते ज्ञानेश्वर काकड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाची प्रारंभ भारत माता पूजन व जिल्ह्यातील पहिले हुतात्मा लान्स नायक कोंडाजी दराडे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
ज्येष्ठ माजी सैनिक सुभेदार दिनकर पवार, लक्ष्मीकांत पारनेरकर, भारत खांदवे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी लाभली.प्रसंगी सैन्यात सेवेत असलेल्या जवानांचे माता पिता विमल व अंबादास शेलार ,नामदेव पवार, केशव नागरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी माजी सैनिक दिलीप कोळी,गोविंदराव जगताप, देविदास शिरसाठ, गुलाब कणखर भाऊसाहेब आहेर, प्रकाश वराडे, माधवदास पांडे ,विकास मुंडे, आबा तिडके, श्रीवास्तव आदि माजी सैनिक उपस्थित होते.
विश्वशांती हास्ययोग समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षा जयश्री गावित, हॅपी अवर्स हास्य क्लब अध्यक्षा छाया थोरात, भारतीय किसान संघ महिला प्रमुख सुनिता आव्हाड, सुनिता काकड यांच्या हस्ते कुंकू पूजन करण्यात आले.
याप्रसंगी कमल बागुल, अलका चौधरी ,सुनंदा कुमावत, मंगल अहिरे, मीना बागुल आदींसह महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पुंडलिक खोडे, राहुल कुलकर्णी,रतन पगार, सुशील शिंदे ,शिवाजी महानुभाव, विठ्ठल भवरे, विक्रम भालेराव, बाळासाहेब पिंगळे, शरद काकड, नंदू नांदवणे विलास तिडके, पंडित माळी, भास्कर थेटे, संजय गामणे, विष्णू काकड, देवराम पवार आदींसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुदर्शन काकड, संदीप मानकर, अनिल काकड, ऋषिकेश ढगे, सुचंद्र ढाकणे, स्वप्निल दाणी, सचिन काकड, दिलीप पताडे आदींनी परिश्रम घेतले.