सरकार स्वतःचे अपयश सैनिकांच्या नावाखाली झाकत आहे-सचिन बडदे

Cityline Media
0
भाजपाची तिरंगा सन्मान यात्रा म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात फिरण्यासारखे आहे

श्रीरामपूर दिपक कदम सध्या भारतीय जनता पार्टीने पूर्ण भारतभर तिरंगा सन्मान यात्रा राबवण्याचे काम चालू केलं आहे पण त्यांनी ही यात्रा फक्त स्वतःचा अपयश राबवण्यासाठी चालू केली आहे असा आरोप शिवसेनेचे श्रीरामपूर उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी केला.
पुढे बोलताना ते असे म्हणाले की ज्यावेळी भारतीय पर्यटकांवर हिंदू म्हणून गोळीबार करण्यात आला व त्यांना मारण्यात आले त्यानंतर मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर राबविले त्यावेळी सर्व भारतीयांना खूप आनंद झाला होता की आता आपण पाकिस्तानचा पूर्ण नायनाट करून सर्व हिंदुस्तानी लोकांना न्याय देऊ परंतु झाले विपरीतच उलट ज्यावेळी भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले त्या दिवशी पाकिस्तानी आपल्या सीमा वरती भागावर ४० ते ५० लोकांना गोळ्या घालून मृत्युमुखी पाडले त्यानंतर अमेरिकेच्या सांगण्यावरून आपण युद्धबंदी केली त्यामध्ये भारताचा जगामध्ये फार मोठा अपमान झाला कारण युद्धबंदी सकाळी ११ वाजता अमेरिकेने जाहीर केली आपण पाच वाजता केली तरीसुद्धा पाकिस्तानी रात्री नऊ वाजता आपल्यावर बॉम्ब टाकले आणि आपले सीमावरती भागावर पुन्हा एकदा आक्रमण करून अनेक नागरिकांना मारले आणि मग त्या दिवशी रात्री त्यांनी युद्धविराम केला म्हणजे युद्धाची सुरुवात पाकिस्तानी केली आणि शेवटही पाकिस्तानने केला त्यामध्ये मोदी सरकारचे काय कर्तुत्व हे समजून येत नाही.

सध्या जगामध्ये पाकिस्तान इतका कमजोर झाला आहे की तो यापूर्वी कधीही नव्हता बलोच भाग असेल किंवा अफगाणिस्तान असतील हे पाकिस्तान विरुद्ध लढायला तयार होते आपण त्यांचा फायदा घेऊन कमीत कमी पाक व्याप्त काश्मीर तरी भारतामध्ये आणायलाच पाहिजे होता परंतु आपण अर्ध्यावर हे युद्ध थांबवले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा हल्ला केला.

मोदी सरकार सांगत आहे आपण पाकिस्तानला झुकवले परंतु पाकिस्तानने अशा कोणत्या अटी शर्ती आपल्या मान्य केल्या हे मोदी सरकार सांगायला तयार नाही कोणत्याही अतिरेकेला भारताला सोपवण्यात पाकिस्तानने स्पष्ट नकार दिला उलट मसूद अजहर हा आमच्या इथे साधा मौलाना आहे तो दहशतवादी नाही असे पाकिस्तानने भारताला ठणकावून सांगितले त्याचप्रमाणे मोदी सरकारने सांगितले होते की आपण पाकिस्तानचे चार विमान पाडले व पाच पायलट यांना अटक केली परंतु तसा कोणताही पुरावा सरकारकडून आजपर्यंत देण्यात आला नाही. म्हणजे फक्त भारतीयांच्या भावनांशी खेळ चालला आहे की काय अशी सर्व भावना १४० कोटी भारतीय जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.

पाकिस्तान संपवायची पाक व्याप्त काश्मीर भारतामध्ये घेण्याची पाकिस्तानचे तीन ते चार तुकडे करण्याची हीच संधी होती परंतु या सरकारने हा निर्णय घेऊन काय साध्य केले हे आजपर्यंत ही समजले नाही उलट हे आपण युद्ध जिंकले कसे हेही नागरिकांना समजत नाही कारण हानी फक्त भारताची झाली आहे.

या अशा प्रकारच्या यात्रा काढणे म्हणजे मूर्खाच्या नंदनवन मध्ये फिरण्यासारखे आहे तरी भारतीयांनी आता जागृत होणे गरजेचे आहे जे लोक खोट्या देश प्रेमाच्या नावाखाली आपल्याला रागवत आहे त्यांना जाब विचारा कारण या लोकांसाठीच आपण मतदान केलेलं आहे आणि जर हे लोक आपल्या भावनेची कदर करत नसेल तर त्यांना प्रश्न विचारून आपल्यावर झालेल्या अन्यायास विरोध करा असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी यावेळी केले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!