गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई पर्समधून सोन्याचे दागिने चोरल्याची दिली कबुली
नाशिक दिनकर गायकवाड-
रामकुंडा परिसरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्यास नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ ने अटक केली आहे.
शंकर भानुदास कामे (वय २१, रा. आशी, ता. परतूर, जि. जालना) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून, रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
रामकुंड परिसरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीच्या घटना घढल्या होत्या.त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त प्रशांत बाच्छाव
आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिटच्या पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस हवालदार रवींद्र चारोस्कर यांनी तपास सुरू केला.
आरोपी भद्रकाली परिसरात सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी येथे त्याला अटक केली.त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कालेश्वर मंदिर आणि सांडवा देवी मंदिर परिसरातून महिलांच्या पंचवटी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल असून,गुन्ह्यातील सोने विकत घेतलेल्या सोनाराने १२ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे दागिने पोलिसांसमोर जमा केल्याने दोन गुन्ह्यांचा यशस्वी तपास लागला आहे.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हिरामण पोलीस उपनिरीक्षक गुदमर चेतन बीवंत, पोलीस हुमा सद्र आढाव, येोगीराज गायकवाड देवीदास ठाकरे, उत्तम पवार, रोहिदास लिलके, पो.अंमलदार विलास वारोस्कर,अनुजा येलवे, समाधान पवार आदींचा सहभाग होता पुढील पंचवटी पोलीस ताण्याचे पोलीस करीत आहेत.