जिल्ह्यातील ऐतिहासिक वाड्यांचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं-भूषण देशमुख

Cityline Media
0
सुमित डेंगळे लिखित 'ऐतिहासिक वाडे व घराणी' पुस्तकावर परिसंवाद

संगमनेर संजय गायकवाड सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाने आयोजित केलेला सुमित डेंगळे लिखित 'ऐतिहासिक वाडे व घराणी' या पुस्तकाचा प्रकाशनवजा परिसंवाद महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला.परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार व इतिहास अभ्यासक भूषण देशमुख,ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व 'उज्ज्वल उद्यासाठी'चे संपादक प्रा.विठ्ठल शेवाळे,भेंडा येथील जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे आणि लेखक सुमित डेंगळे सहभागी होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स.ब.वि.प्र.स. संस्थेचे अध्यक्ष आणि मा.आमदार डॉ.सुधीर तांबे होते.
देशमुख म्हणाले, ‘‘डेंगळे यांनी उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ हून अधिक ऐतिहासिक वाडे आणि घराण्यांवर लिहिलेले रिपोर्ताज म्हणजे एक उत्तम दस्तऐवज आहे.यासाठी संदर्भ ग्रंथांच्या अभ्यासाबरोबरच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत. यातून नगर जिल्ह्याचा गौरवशाली वारसा आपल्यासमोर आला आहे.’’

डॉ. लांडगे म्हणाले, ‘‘इतिहासात कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्ती आणि घराण्यांचा इतिहास समोर येणं गरजेचं आहे.पुस्तकात वर्तमानाच्या नजरेतून भूतकाळाचा घेण्यात आलेला वेध आहे.अस्सल संदर्भ ग्रंथांची जोड असलेल्या या ग्रंथाला एका संदर्भग्रंथाचंच स्वरूप प्राप्त झालं आहे.’

डॉ. तांबे म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळात सखोल अभ्यासाची वृत्ती नाहीशी होताना दिसत आहे. इतिहासाचा तटस्थ अभ्यास होणे गरजेचे आहे. तसचं त्यातून समाजाने धडा घेणं गरजेचं आहे. डेंगळे यांच्यासारख्या अभ्यासू तरुणांनी समोर यायला हवं.’’

यावेळी काही ऐतिहासिक घराण्यांचे वारसदार असणाऱ्या देसाई देशमुख (कुकाणा), सदाशिवराव थोरात (पानोडी), संतोष दहातोंडे (चांदा), गजेंद्र जाधवराव (माहेगाव देशमुख), विलास जाधव (निमगाव जाळी) यांनीही आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विठ्ठल शेवाळे यांनी केले तर सूत्रसंचालन,आभारप्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ आणि इतिहास विभाग प्रमुख त्रिंबक राजदेव यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!