शब्दगंधच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टकार्ड लेखन स्पर्धा

Cityline Media
0


अहिल्यानगर दिपक कदम शालेय विद्यार्थ्यांना पत्र लेखनाची सवय लागावी यासाठी शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय पत्र (पोस्ट कार्ड)लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे,अशी माहिती शब्दगंधच्या राज्य कार्यकारणी सदस्या शर्मिला गोसावी यांनी दिली.
   शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांना लेखनाची सवय लागावी, हस्ताक्षर सुधारावे, विसरत चाललेली पोस्ट कार्ड लेखनाची उपजत कला जोपासली जावी यासाठी पोस्ट कार्ड लेखन स्पर्धा घेण्याबाबत निर्णय घेतला.

 इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आई, वडील,मामा,मामी, मावशी,काका,काकू, आजी, आजोबा, यापैकी कोणत्याही एका व्यक्तीला पोस्ट कार्डवर  सुट्टी बाबत पत्र लिहून ते शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा,लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग महालाजवळ, तपोवन रोड,सावेडी, अहिल्यानगर ४१४००२  या शब्दगंधच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहे.पोस्टकार्ड पाठवल्यानंतर ९९२१००९७५० वरती तसा मेसेज पाठविण्यात यावा.प्रथम तीन उत्कृष्ट पत्रलेखनाला पुस्तके, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित येणार आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्ड लेखन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे कार्यवाह भारत गाडेकर खजिनदार भगवान राऊत, राज्य संघटक प्रा.डॉ.अशोक कानडे, राजेंद्र फंड,प्रा. डॉ.अनिल गर्जे, जयश्री झरेकर, स्वाती ठुबे यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!