हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थान मंदिर परिसरात वृक्षरोपण
संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव- तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणून ओळखली जाणारे श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान हिवरगाव पावसा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्तायात आले होते.
शहर शिवसेना व युवासेना यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.परंतु अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेमुळे आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे शिवसेना युवा सैनिकांना आवाहन केले त्यामुळे संगमनेर युवा सेनेच्या वतीने कोणताही गाजावाजा डामडौल न करता तसेच कोणतेही फ्लेक्स बॅनर न लावता वृक्ष लागवड व संवर्धन हेतूने झाडे लावून वाढदिवस साजरा करण्यात आला.
छायाचित्र-बच्चन भालेराव
हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थान मंदिर परिसरात वड,पिंपळ,लिंब आणि इतर प्रकारची झाडे लावून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस करण्यात आला.युवा सेना विस्तारक मितेश साटम यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला असल्याची
माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, जिल्हा समन्वयक फैसल सय्यद यांनी दिली.यावेळी शिवसेना माजी शहर प्रमुख अमर कतारी तसेच भाऊसाहेब हासे,पप्पू कानकाटे,भीमाशंकर पावसे, योगेश खेमनर,इम्तियाज शेख यांच्या हस्ते मंदिर परिसरात आणि गडाच्या पायथ्या लागत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संभव लोढा,वैभव अभंग,सागर भागवत,पंकज पडवळ,सचिन साळवे, राजाभाऊ सातपुते,अमोल डुकरे, प्रकाश गायकवाड,अशोक लक्ष्मण पावसे,संपत केशव पावसे,यादव त्र्यंबक पावसे, रामनाथ शिंदे,गणेश शिंदे, भाऊसाहेब पावसे,संदीप टेमगिरे,छगन भालेराव,समाधान भालेराव,खंडू बोराडे, सिताराम गडाख यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
