राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Cityline Media
0
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थी सन्मान २००५ चे आयोजन 

पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क पुणे येथील गोऱ्हे बुद्रुक हॉटेल शिवार,  येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पुणे जिल्हा यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी ३०० वी जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.
महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या  वाढदिवसानिमित्त खास आयोजन करण्यात आलेल्या "गुणवंत विद्यार्थी सन्मान २०२५" या कार्यक्रमास त्यांनी उपस्थिती लावली.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याला अभिवादन करताना त्यांच्या न्यायप्रिय, लोककल्याणकारी आणि प्रेरणादायी कार्यावर विचार यावेळी व्यक्त करण्यात आले, त्यांच्या विचारांनी आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल. असा आशावाद प्रसंगी व्यक्त झाला.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.विशेष कौतुक करावे लागेल रुळे गावचा सुपुत्र शिवांश जागडे याचे, ज्याने अवघ्या २२ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा उत्तीर्ण करत देशात २६ वा क्रमांक मिळवला. या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचा विशेष सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमला राजेंद्र पवार, सौ. शुभांगी खिरीड, शशिकांत किवळे, राजेंद्र कोंडे, शुक्रा वांजळे, प्रवीणद शिंदे, लक्ष्मण माताळे, शांताराम किवळे, शशिकांत जाधव , राजाराम माताळे, गिरीश माताळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजकांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!