प्रिंप्री लौकीचे बाळासाहेब रंगनाथ बिडवे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Cityline Media
0
सौ.शालिनी विखे पा.यांनी दिली बिडवे कुटुंबाला सांत्वन भेट

आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी आजमपुर येथील प्रगतशिल शेतकरी व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले जनसेवा मंडळाचे जेष्ठ नेते पिंप्री लौकी अजामपुर वि.वि.कार्यकारी सेवा सह. सोसायटीचे विद्यमान संचालक नाभिक समाजाचे सक्रीय कार्यकर्ते बाळासाहेब रंगनाथ बिडवे यांचे हृदय विकाराच्या तिव्र धक्याने  निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ५९ वर्ष होते
त्यांच्या पश्चात वडील पत्नी पाच भाऊ भावजया दोन मुले  सुना एक मुलगी जावई चुलत भाऊ पुतणे पुतण्या नातवंडे असा मोठा परिवार आहे येथील विमा प्रतिनिधी संजय बिडवे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बिडवे शांताराम बिडवे विजय बिडवे राजेंद्र बिडवे यांचे ते बंधु तर नाभिक समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक रंगनाथ बिडवे यांचे ते चिरंजीव होत.
प्रवरेचा सच्चा कार्यकर्ता निखळला-सौ.शालिनी विखे पा.
अ.नगर. जिल्हा परिषदच्या मा. अध्यक्षा सौ.शालिनी राधाकृष्ण विखे पा. यांनी नुकतीच बिडवे कुटुंबात सांत्वन भेट देत दिवंगत बाळासाहेब बिडवे यांच्या विखे पाटील कुंटुंबियाचे असले संबंध व जनसेवा मंडळाला दिलेल्या योगदानासह पिंप्री परिसरात केलेल्या धार्मिक सामाजिक कार्याला उजाळा देत बाळासाहेब बिडवे यांना श्रध्दांजली वाहिली यावेळी जेष्ठ कार्यकर्ते सेवानिवृत्त प्रा. कान्हु गिते सह जनसेवा मंडळाचे सर्व जेष्ठ पदाधिकारी ग्रा.प. पदाधिकारी सेवा सोसायटी पदाधिकारी यांच्या सह ग्रामस्थ नातेवाईक तसेच बिडवे कुटुंबातील सर्व नातेवाईक सदस्य उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!