अकोले प्रतिनिधी भंडारदरा धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या जागांवर पर्यटन विकास करण्याचे धोरण आखले असून याबाबतचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी धरण परीसरात जलसंपदा विभागाच्या जागांची विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
अनेक वर्षे झालेल्या दुर्लक्षामुळे जागांवर अतिक्रमण झाली असून निर्धारीत वेळेत ही अतिक्रमण काढण्याच्या सूचना विभागातील अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
'हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र' या उपक्रमाचा भाग म्हणून जलसंपदा विभागाने धरण परीसरात वृक्ष लागवड चळवळ सुरू केली त्याचा शुभारंभही यावेळी केला.
