अकोले प्रतिनिधी सेवा सहकारी सोसायटीच्या सचिव संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन येथे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.तसेच राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय सहकार मंत्री.. अमित शाह यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रीय सहकार धोरणामुळे सेवा सोसायट्यांचे भविष्य उज्वल होणार असून सचिवांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही,या अधिवेशनात दिली.
