कर नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे देशाच्या विकासाला चालना मिळते-राज्यपाल

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क देशाच्या प्रगतीसाठी आयकर विभाग देत असलेले योगदान मोठे आहे. करनियमनाच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे देशाच्या विकासाला चालना मिळते,असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आयकर विभागाच्या १६६ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील कौटिल्य भवन येथे आयोजित समारंभात केले. 
या कार्यक्रमास आयकर अपीलेट ट्रिब्युनलचे उपाध्यक्ष शक्तिजित डे, प्रधान मुख्य आयकर आयुक्त मालती श्रीधरन, विविध कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी,सेवानिवृत्त अधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त क्रीडापटू उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी कौटिल्य (चाणक्य) यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसेच, सर्वाधिक कर भरलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया,टाटा सन्स प्रा.लि., एचडीएफसी बँक लि.आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तसेच सेवनिवृत्त अधिकारी आणि आयकर विभागाचे उत्कृष्ट खेळाडूंना राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!