दिवंगत विलास देशमुख यांचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुर्ण केले-सत्यजित तांबे

Cityline Media
0


मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क २४ जुलै २०२५ हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा असा आहे.कारण दिल्लीतील जेएनयू  विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मराठी भाषा आणि मराठा इतिहास अध्ययन केंद्र सुरू झालं आहे.
२००७ – तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलास देशमुख यांनी जेएनयू  मधील मराठी केंद्रासाठी १.५ कोटींचा निधी दिला.२००४ – तत्कालीन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा इतिहास व संरक्षण अभ्यासासाठी १० कोटींचा निधी मंजूर केला.७ ऑगस्ट २०२४ अशी 

माहिती देताना आमदार तांबे पुढे म्हणाले की मी तत्कालीन मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यवाहीसाठी पत्र दिले होते १९ डिसेंबर २०२४ – विधानपरिषदेत केंद्राची मागणी ठामपणे मांडली.
१२ फेब्रुवारी २०२५ – मंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रश्न मार्गी लागल्याची माहिती मिळाली.

या संपूर्ण प्रवासात मूळचे नाशिकचे आणि दिल्लीमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचं मार्गदर्शन मला लाभलं त्यांचे देखील खूप आभार अशी कृतज्ञता आमदार तांबे यांनी व्यक्त केली.

आणि अखेर.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या छत्रपती शिवाजी महाराज मराठा इतिहास व मराठी भाषा अभ्यास केंद्राचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.या ऐतिहासिक प्रसंगी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले.असे विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!