माझी डॉक्टर बायको पाकिस्तानी खबरी

Cityline Media
0
तपास यंत्रणेला व्यावसायिक पतीने तक्रार करत दिली माहिती
- नोएडा सिटीलाईन न्यूज नेटवर्क येथील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने त्याची पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर असल्याचा दावा केला आहे. एका पाकिस्तानी युवका सोबत तिचे लग्न झाले असतानाही तिने माझ्याशी लग्र केले. लग्रानंतर ३ महिने ती बेपत्ता होती असे पतीने म्हटले आहे. याबाबत पतीने केंद्र सरकार आणि पोलिसांकडे तपास करण्याची मागणी केली आहे.
नोएडाच्या सेक्टर १०५ मध्ये जज कॉलनीत राहणारे व्यावसायिक लोकेश राठी यांनी दिल्ली आणि नोएडा पोलिसांना याबाबत तक्रार केली आहे.केंद्र सरकारला पत्र पाठवूनही तपास करण्याची मागणी केली आहे. लोकेश राठी म्हणाले की, एका मेट्रोमोनियल वेबसाईटवरून डिसेंबर २०१९ साली एका व्यक्ती सोबत माझी ओळख झाली.त्यातून आम्ही लग्र केले.

लग्नानंतर काही - काळाने १२ मार्च २०२० रोजी ती अचानक बेपत्ता झाली. जेव्हा तिचा शोध घेतला तेव्हा अनेक खुलासे झाले. त्यामुळे मला आणि माझ्या
कुटुंबाला धक्का बसला.कोरोना काळापासून मी माझ्या पत्नीचा शोध घेत होतो.होळीच्या निमिताने ती तिच्या माहेरी गेली होती तिथूनच ती बेपत्ता झाली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात संबंधित महिलेनेही व्यावसायिका विरोधात दिल्लीच्या द्वारका पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. घरगुती हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप तिने पती लोकेश राठीवर केला आहे.याबाबत पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे. या आरोप पत्राला लोकेशने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले आहे.

 त्यात घरगुती हिंसाचाराच्या सुनावणीत पत्नी उपस्थित राहत नाही, असेही पतीने म्हटले आहे.पाकिस्तानी युवकासोबत चीनमध्ये लग्र केल्याचा दावा २००४ साली एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी पत्नी चीनला गेली होती. चीनमध्ये तिने २००८ मध्ये पाकिस्तानातील युवक अतीक सोबत लग्र केले.या लग्रातून या दोघांना १ मुलगाही आहे. जो सध्या पाकिस्तानात राहतो.चीनमध्ये असताना ही महिला बऱ्याचदा पाकिस्तानात गेली. सन

२०११ साली चीनमधून ती भारतात परतली. त्यानंतर मे २०१२ साली पुन्हा पाकिस्तानात गेली. तिथे ३ महिने १७ दिवस राहिल्यानंतर ती भारतात परतली. त्यानंतर एक आठवडा येथे राहून पुन्हा पाकिस्तानात गेली आणि तिथे ५ दिवस राहिली, असा दावा पतीने केला आहे.

पत्नी सतत पाकिस्तान आणि भारतात येत जात होती. ती दिल्लीसह इतर शहरातील लोकांशीही संपर्कात असते. जेव्हा पत्नीचे पाकिस्तानी कनेक्शन बाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला आणि माझ्या कुटुंबाला अज्ञात नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या.त्याचीही तक्रार पोलिसांना दिल्याचे पती लोकेश राठी यांनी म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!