नाशिक दिनकर गायकवाड नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वैयक्तिक सभासदांतून दिंडोरी तालुका प्रतिनिधीपदी चिंचखेडचे संपत संधान व दशरथ पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे संचालक दादासाहेब पाटील, मधुकर गटकळ, भगवान जाधव, अजित दवंगे, सुरेश फुगट, समाधान पाटील, डॉ. प्रदिप तिडके यांच्या हस्ते दोन्हीही संचालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चिंचखेड विविध कार्यकारी सोसायटी संचालक शिवानंद संधान, रामनाथ पाटील, राजेंद्रा करंडे, कैलास पाटील, कुणाल संधान आदी उपस्थित होते.