नाशिक महानगरपालिका : गतवर्षापेक्षा सात कोटींची घट चिंताजनक
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगर पालिकेच्या कर विभागाने शहरातील मिळकत धारकांना १ एप्रिल ते ३० जून २०२५ दरम्यान मिळकत करार कर सवलत जाहीर केली होती.
एप्रिल, मे मध्ये ८ टक्के तर जूनसाठी ६ टक्के कर सवलत मनपाने दिली होती.वाढीव कर सवलत देऊनही करदात्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. कारण कर वसुलीची गाड़ी ९८ कोटी ६९ लाखांपर अडकली आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळेस कर सवलतीची टक्केवारी कमी असूनही नागरिकांनी त्यास प्रतिसाद देत मनपाच्या तिजोरीत १०५ कोटी ५६ लाख ४२ हजारांचा कर जमा केला होता. वाढीव कर सवलत दिल्याने सुद्धा सव्वाशे कोटीपर्यंत वसुली अपेक्षित असताना ती १८ कोटीवर अडकली आहे.
दरम्यान थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने नियमित कर दात्यांना एप्रिल व मे महिन्यात ८ टक्के तर जूनमध्ये ६ टक्के कर सवलत दिली.अतिरिक्त कर सवलत देऊनही असून आता नाशिक महानगरपालिकेयर पाचशे कोटींचा थकबाकीचा डोंगर आहे.
थकबाकीची रकम वसूल करण्यासाठी कर संकलनकडून अभय योजना, शास्तीमध्ये ९५ टक्के सूट यासारखी सवलत योजना राबवली गेली,नाशिक महानगर पालिकेला जीएसटी अनुदाना खालोखाल कर उत्पनाचा मुख्य स्त्रोत आहे. घरपट्टी वसुलीसाठी मनुष्यबळाचा अभाव व देवक वाटपातील संथगतीमुळे घरपट्टीच्या बालू मागणीसह थकबाकीचा आकडा पाचशे कोटीपर्यंत गेला आहे.
घरपट्टीच्या नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला महापालिकेने कर सवलत योजना राबवली व त्यास बांगला प्रतिसाद मिळाला.यंदाही करदात्यांनी प्रतिसाद दिला असला तरी मागील वर्षीच्या तुलनेत संख्या कमी आहे.
दरम्यान,जून महिन्यात शहरातील ४० हजार २ मिळकत धारकांनी २० कोटी ९८ लाख ८१ हजार ४०७ कन भरत सहा टक्क्यांच्या वसुलीचा बांगला फायदा उबलला. विशेष म्हणजे गेल्या वर्ष पेक्षा यंदा ५ कोटी ६१ लाखांची वसुली अधिक झाली आहे.
जून महिन्यात सहा टके कर सवलत देण्यात आली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल २० कोटी ९८ लाखाची वसुली इतकी आहे. ज्या असेल त्यांनी करसवलतीचा फायदा येऊन महापालिकेला सहकार्य करावे.अन्यथा अशा मिळकत केली जाईल, असे कर संकलन विभागाचे उपायुक्तांनी स्पष्ट केले.
