पारंपारिक शेतीतील अडचणींवर मात करत गोडसेचे ड्रॅगन फ्रुट प्रयोग यशस्वी

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील उमराळे खुर्द येथील शेतकरी रामनाथ बाळू गोडसे यांनी पारंपरिक शेतीतील अडचणींवर मात करत ड्रॅगन फ्रूट शेतीत यशस्वी प्रयोग केला आहे.
द्राक्ष, ऊस व भाजीपाला शेतीत सतत होणाऱ्या तोट्यामुळे त्यांनी शेतीत बदल करण्याचा निश्चय केला आणि ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरू केली. सुरुवातीला त्यांनी ४ एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. प्रत्येक एकरासाठी सुमारे ६ लाख रुपयांचा खर्च आला. त्यांना सुरुवातीला निकृष्ट रोपे, कमजोर संरचना आणि हवामानाशी संबंधित तांत्रिक अडचणी भेडसावत होत्या. मात्र, त्यांनी हार न मानता स्वतःची उच्च प्रतीची रोपवाटिका तयार केली. योग्य मार्गदर्शन घेतले आणि

लागवडीची सुधारित पद्धत स्विकारली. आज त्यांच्या शेतीत कूलीळ व उवाणाचे दर्जेदार उत्पादन घेतले जात आहे. हे वाण चवदार असून बाजारात यास मोठी मागणी आहे. ड्रान फ्रूटला १० महिन्यांत फळधारणा सुरू होते. प्रत्येक एकरात २०-२५ टन उत्पादन मिळते. एकराला ३२८० रोपे व ८२० पोल्स लागतात, जे संपूर्ण शेती अधिक उत्पादक आणि संघटित बनवतात. सध्या बाजारात

फळांना ७५ ते १०० रुपये प्रति किलो दर मिळत असून ही शेती आर्थिक दृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरते. या यशस्वी प्रयोगाचा अभ्यासके. डी.एस.पी. कृषी महाविद्यालय, चाचङगाव येथील विद्यार्थ्यांनी केला. ओंकार मोगल, जय मुरडनार, शुभम जाधव, जितेंद्र गायकवाड, सौरभ हरक, दर्शन मालोदे या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गोडसे यांचे अनुभव, अडचणी आणि यशाची प्रक्रिया समजून घेतली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!