दिंडोरीच्या जनता विद्यालयात वाघ,बोरसे यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांना स्मृति दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. पी. शेजवळ होते.कर्मवीरांच्या प्रतिमा पूजन मान्यरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक ए. एस. आहेर यांनी केले. प्राचार्य शेजवळ यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी मविप्र संस्था स्थापनेत विकासात फार मोठे योगदान दिले आहे.

 शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले व शेतकऱ्यांच्या भातास योग्य भाव मिळवून देण्यास फार मोठा वाटा आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये आद्य कर्मवीरांमध्ये बहुमोल असे स्थान मिळवले, शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचून समाज सुधारला पाहिजे म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे हे ब्रिद उराशी बाळगून राजकीय, सहकार व शिक्षण क्षेत्रात कार्य केले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत कर्मवीरांना अभिवादन केले.याप्रसंगी शिक्षक वृंद, कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!