नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क नागपूर येथे महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद नागपूर यांच्या ‘मिशन बाल भरारी’ या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बालवाडीच्या माध्यमातून लहानपणीच बालमनावर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, महानगरातील मुलांना ज्या सेवासुविधांच्या माध्यमातून घरच्याघरीच जो विश्वास मिळतो तो विश्वास ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही मिळावा यादृष्टीने ‘मिशन बाल भरारी’ उपक्रमाचा उद्देश आहे.
