उंबरी बाळापुर येथील शेतकऱ्यांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील उंबरीबाळापुर येथील शेतकरी मच्छिंद्र दगडू कालेकर (वय ५६) यांच्यावर मंगळवारी (दि. १७ जून) जनावरांसाठी गिनी गवत कापत असतांना बिबट्याने अचानक प्राणघातक हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडल्यानंतर तबल  ४० दिवसा नंतर एक मादी बिबट्या पिजऱ्यातं जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले असुन उर्वरित बिबट्या तत्काळ जेरबंद करण्याची मागणी येथील शेतकरी किरण कालेकर यांनी केली आहे.घडलेल्या घटनाबाबत सविस्तर वृत्त असे की,संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारातील कारवाडी येथील मच्छिंद्र दगडू कालेकर हे यांच्या वर हल्ला केलेल्या घटना स्थळालरून एक मादी बिबट्या शनिवार दि २६ जुलै रोजी भक्षाच्या शोधात भटकत असताना पिंजऱ्यांमध्ये कैद झाली सदर घटनेची माहिती त्यांनी तत्काळ वन विभागाला दिली.

 चाळीस दिवसानंतर अखेर हा मादी बिबट्या हि जेरबंद झाली असली तरी वडिलांवर हल्ला करणारा बिबट्या हाच आहे , याबाबत साशंकता आहे. वडिलांवर हल्ला करणारा बिबट्या हा शरिराने मोठा होता तसेच त्याचा जबडा ही मोठा होता जेरबंद झालेला बिबट्या त्यांच्या तुलने किरकोळ दिसतो. परीसरात अजुन ही बिबट्ये आहे. ते ही तत्काळ जेरबंद करण्यात यावे अशी वनविभागाला विनंती केली असल्याचे किरण कालेकर यांनी सांगितले.
उंबरी बाळापुर बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करा.
उंबरीबाळापुर ता संगमनेर येथे दोन महिन्यात जवळपास ५ बिबटे पकडण्यात आले असुन बिबट्याला परीसरामध्ये लपण क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे तसेच अन्न व मुबलक पाणी उपलब्ध आहे.शासनाने यांना बाहेर सोडण्या ऐवजी जवळील वनविभागाच्या क्षेत्रामध्ये बंदिस्त करावे. ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर जास्त असतो किंवा जेथे बिबट्या आणि मानवी वस्ती यांच्यातील संघर्ष होण्याची शक्यता जास्त असते असे बिबट प्रवण क्षेत्र म्हणून शासन घोषित करते.आज शेतकऱ्यांकडे अनेक नंदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे ते कोणी घेऊन जात नसल्यामुळे शेतकरी विनामूल्य वनविभागाला मोफत देतील.
संपत भुसाळ,शेतकरी,उंबरीबाळापुर
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!