शेडगावच्या सुपुत्राकडून गावाला जलशुद्धीकरण केंद्राची अमूल्य भेट

Cityline Media
0
विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची भेट

आश्वी संजय गायकवाड आपल्या जीवनात सेवाभावी वृत्ती दरवळती ठेवून सामाजिक कार्याचा वसा जपत गावाशी घट्ट नाळ जोडून ठेवणारे संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील बापूसाहेब रामभाऊ सांगळे हे उच्चशिक्षित असून  मुंबई स्थित आहे नुकतेच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या गावाच्या विकासात मोलाची भर घातल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात माध्यमिक विद्यालयात नुकतेच तब्बल ५०० लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण उपकरण प्लांट देणगी स्वरूपात देऊन विद्यार्थ्यांना शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ,शिक्षकवृंद आणि प्राचार्य अशोक गिते यांची कृतज्ञता मानत आनंद व्यक्त केला.

या सकारात्मक कृतीबद्दल माध्यमिक शाळा कमिटी अध्यक्ष नारायण नागरे, रंगनाथ हरी फड, शांताराम बाबुराव फड,राजू हरी सांगळे, सुरेश तुकाराम फड, निवृत्ती बाबुराव सांगळे,संपत बाबुराव सांगळे,साहेबराव सोनवणे, कैलास कारभारी आंधळे आदी मान्यवरांनी सांगळे यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

शैक्षणिक क्षेत्रात मौलिक योगदान २००७ पासून गावातील प्राथमिक शाळेला संगणक संचाची भेट,संगणक शिक्षणाची सुरुवात.
प्राथमिक शाळेला इंटरॲक्टिव डिस्प्ले प्रोजेक्टर तर हायस्कूललाही इंटरॲक्टिव डिस्प्ले – आधुनिक तंत्रज्ञानाची जोड.धार्मिक कार्यात सहभाग
गावातील मंदिरांना झुंबर व लक्ष्मीमातेची चांदीची मूर्ती-मुखवटा भेट देऊन धार्मिक कार्यातही योगदान.
मोहटा देवी मंदिर, पाथर्डी येथे ७० सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली कोरोना काळात केलेले मोठ्या प्रमाणावर मदतकार्य.
गावातील प्रत्येक शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात देणगीद्वारे मदतीचा हात देतात.
-जनहितार्थ कृतीमुळे बापूसाहेब सांगळे हे गावचे भुषण
गावाच्या प्रत्येक विकासकामात सक्रिय सहभाग,
शैक्षणिक व धार्मिक संस्थांना दिलेले योगदान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा गावाशी केलेला संगम यामुळे. बापूसाहेब सांगळे हे शेडगावकरांसाठी अभिमानाचे व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.  
राजु आंधळे सामाजिक कार्यकर्ते शेडगाव
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!