जातिवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड मोजमाप करून बांधकाम करायचे नाही,असे म्हणून नाशिक मधील एका ठेकेदाराला जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी प्रकाश हरिभाऊ पठाडे (रा.पठाडे फार्म, मखमलाबाद) हे ठेकेदार असून, १२ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास गंगापूर लिंक रोड येथे त्यांची व्याही नामदेव विठोबा माळी (वय ५३) यांच्या घराच्या कामाचे मोजमाप करीत होते.

त्यावेळी त्यांच्या व्याह्याचे वडील विठोबा काशीनाथ माळी (वय ८५) व त्यांचा मुलगा दिलीप विठोबा माळी,बाळासाहेब विठोबा माळी हे तेथे आले व आमच्या घराचे मोजमाप व बांधकाम करावयाचे नाही,असे बोलत असताना विठोबा माळी यांचे नातेवाईक पंडित विठ्ठल तिडके व त्यांचा मुलगा विशाल मधुकर तिडके (रा. मखमलाबाद) हे तेथे आले. 

त्यांनी फिर्यादीस मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ करून मारून टाकण्याची दमदाटी केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!