बबलू पाटील यांच्या गुरूस्पर्श लघुचित्रपटाचे पोस्टर अनावरण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील 
खेडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शुभम बस्ते यांच्या 'गुरुस्पर्श' या लघुचित्रपटाचे पोस्टर अनावरण झाले.
यावेळी व्यासपीठावर खासदार भास्कर भगरे,मविप्र संचालक प्रवीण जाधव, खेडगावचे सरपंच दत्तात्रेय पाटील,ॲड.भास्कर पवार,उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष बाबूराव डोखळे, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र ढोको, सीनियर कॉलेज शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश डोखळे,अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष सोमनाथ दुबे, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल शालेय समितीचे अध्यक्ष जयराम पाटील डोखळे, लेखक शुभम पाटील आदी उपस्थित होते.

श्रीकांत कदम यांनी आपल्या मनोगतात बबलू पाटील यांचे या लघुचित्रपट तयार करण्या मागील भूमिका व त्यासाठीचे प्रयत्न,चिकाटी याबाबत माहिती दिली. लेखक बबलू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. खा.भास्कर भगरे यांनी एका सामान्य कुटुंबातून असणाऱ्या बबलू पाटील यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्राणा घ्यावी व सतत प्रयत्नवादी असावे असे प्रतिपादन केले. प्रवीण जाधव यांनी बबलू पाटील यांच्यासारख्या ग्रामीण भागातील कलाकाराने 'गुरू स्पर्श' सारखा सुंदर लघुचित्रपट तयार केल्याचे सांगत

कौतुक केले.ॲड.भास्कर पवार यांनी सांगितले की,शिंदवड सारख्या छोट्या गावातून बबलू पाटील यांच्यासारख्या कलाकाराने सुंदर असा लघुचित्रपट निर्माण केला ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. सूत्रसंचालन साहेबराव सोनवणे यांनी केले तर आभार उपप्राचार्य कैलास आहेर यांनी केले.याप्रसंगी ध्रुव रोकडे, ऋषी जेजुरकर, श्रीकांत कदम, श्याम विसपुते, डॉ. विशाल रायते, भरत कावळे, कारे, राजेश शिंदे, कैलास आहेर पर्यवेक्षिका साधना माळेकर आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!