नाशिक दिनकर गायकवाड सुरगाणा तालुक्यातील
सुरगाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गाव व शाळेत अंमली पदार्थांच्या वापरामुळे होणारी हानी याबाबत जनजागृती अभियान राबवले जात आहे.हे अभियान सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे.ठीक ठिकाणी जनजागृती करण्यात आली आहे.कार्यक्रमास चेतन बागुल,मनोज दुसाने,आबा गोतरणे,देवरे मामा तसेच भैय्या अहिरे आदींसह शिक्षक वृंद,कर्मचारी उपस्थित होते.
