जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लासलगाव पोलिसांना राख्या बांधत केले अनोखे रक्षाबंधन

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड निफाड तालुक्यातील लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित जिजामाता कन्या विद्यालयात रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आले.
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून जिजामाता कन्या विद्यालयामधील विद्यार्थिनींनी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे व इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा सण साजरा केला.सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी देखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.

यंदा हा सण पोलिसांसोबत साजरा करावा अशी संकल्पना जिजामाता कन्या विद्यालयाच्या
घेण्यात आली.विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी भारावले होते.यावेळी सर्व विद्यार्थिनींना पेन भेट देऊन खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,सचिव संजय पाटील,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचलिका निता पाटील, शंतनू पाटील,अभय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ,पर्यवेक्षिका शारदा केदार,सर्व शिक्षक शिक्षिका, कर्मचारी तसेच वि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गायकर यांनी तर आभार श्रीहरी शिंदे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!