नाशिक दिनकर गायकवाड समाजकल्याण विभागांतर्गत निफाड तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, रसलपूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. छाया रेखांकन-प्रकाश कदम
वसतिगृहांच्या कार्यालयात प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध असून वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत,असे आवाहन
वसतिगृहांचे गृहपाल एन. व्ही. मेधणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
निफाड तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,लासलगावसाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी शालेय रिक्त १३ जागा, कनिष्ठ महाविद्यालय ११ रिक्त जागा, वरिष्ठ महाविद्यालय रिक्त १० जागा आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी शालेय एक जागा रिक्त आहे. विजाभज प्रवर्गासाठी कनिष्ठ महाविद्यालय रिक्त १ जागा. इमाव / आ.मा.दृ. वरिष्ठ महाविद्यालय रिक्त १ जागा, विमाप्र प्रवर्गासाठी शालेय रिक्त १ जागा अशा एकूण ३८ रिक्त जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, रसलपूरसाठी अनु. जाती प्रवर्गासाठी शालेय रिक्त २९ जागा, कनिष्ठ महाविद्यालय रिक्त ६ जागा, वरिष्ठ महाविद्यालय रिक्त ८ जागा व व्यावसायिक रिक्त ९ जागा आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी व्यावसायिक रिक्त १ जागा, विजाभज प्रवर्गासाठी शालेय रिक्त १ जागा व विमाप्र प्रवर्गासाठी शालेय रिक्त १ जागा वरिष्ठ महाविद्यालय रिक्त १ जागा अशा एकूण ५६ रिक्त जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ०२५५०-२६७०१८, ८९९९३९१२३७, ८९७५२७७०१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
