नाशिक दिनकर गायकवाड स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिंडोरी शहरात देशभक्तीचा उत्साह आणि सामाजिक जाणीवेचा संदेश एकत्रितपणे उमटला.
दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल, नगरपंचायत आणि पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले 'हर घर तिरंगा घर घर तिरंगा' अशा जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. रॅलीची सुरुवात जनता इंग्लिश स्कूलच्या प्रांगणातून झाली. यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, प्राचार्य शरद शेजवळ, श्रीस्वामी समर्थ केंद्राचे आबासाहेब मोरे, मुख्याधिकारी संदीप चौधरी, माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, नगरसेवक सुजित मुरकुटे, माधव साळुंखे, प्रशासकीय अधिकारी
विजय देवरे, उपप्राचार्य उत्तम भासठ, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारे,संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. ढोल पथक, पोलीस व अग्रिशमन वाहन, घंटा गाडीवर फडकणारे तिरंगे, तसेच हातात राष्ट्रीय ध्वज घेतलेले विद्यार्थी, नगरपंचायत अधिकारी कर्मचारी व पोलीस दलाचा उत्साह लक्षवेधी ठरला. देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारून गेले. प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले व शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाची माहिती देऊन नागरिकांना सहभागाचे आवाहन
केले. दरम्यान, दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ विरुद्ध व व्यसनमुक्ती सप्ताहानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नागरिकांनी अमली पदार्थ विरोधी, व्यसनमुक्ती बाबत माहिती दिली. तसेब मिश्रवस्ती, बाजारपेठ या भागातून रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.
बसस्टैंड, काळी-पिवळी स्टैंड, शाळा कॉलेजेस व शासकीय निमशासकीय कार्यालयांत पॅम्प्लेट आणि स्टिकर्सद्वारे जनजागृती
करण्यात आली. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व विविध नागरिकांनी सहभाग घेतला. पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड पोलीस हवालदार कृष्णा भोये, प्रदीप शिंदे, कमलेश देशमुख, बजरंग कहाटे पोलीस शिपाई दिलीप राऊत आदी सहभागी झाले होते.
दिंडोरी नगर पंचायतीच्या वतीने व्यसनमुक्ती, स्वच्छता आणि हर घर तिरंगा अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेमुळे
देशभक्तीबरोबरच सामाजिक व दृढ झाली.नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी विजय देवरे, युगश्री पाडवी, पल्लवी घिबंद, सोमेश घट, नागेश भालेराव, महेंद्र कांदळकर, अमोल मवाळ, राजेंद्र खिरकाडे, हर्षल बोरस्ते, ईश्वर दंडगव्हाळ, चिंतामण वाघ, सचिन जाधव, राजेंद्र गायकवाड, सागर भदाणे, आनंदा खराटे आदी सर्व कर्मचारी नगरपंचायत दिंडोरीचे उपस्थित होते.
देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेला हा दुहेरी उपक्रम दिंडोरीकरांच्या स्मरणात राहील,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केले.
