मुंबई प्नतिनिधी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे सहकुटुंब लंडन दौऱ्यावर गेले असून येत्या मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी लंडन दौरा यशस्वी करून नामदार रामदास आठवले मुंबईत परतणार आहेत.
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे मंगळवारी सकाळी १० वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत करण्यात येणार आहे.तरी मंगळवारी सकाळी १० वाजता मुंबईतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रीय नेते ना. रामदास आठवले यांच्या भव्य स्वागतासाठी उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केले आहे.
लंडन दौऱ्यावर ना.रामदास आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ सीमा आठवले पुत्र जीत आठवले तसेच अविनाश कांबळे; सौ माधुरी अविनाश कांबळे चंद्रशेखर कांबळे हे सुद्धा लंडन दौऱ्यात ना.रामदास आठवले यांच्या समवेत आहेत.लंडन दौरा यशस्वी करून ना.रामदास आठवले यांचे मुंबईत आगमन होणार आहे.त्या वेळी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ना. रामदास आठवले यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड; सरचिटणीस विवेक पवार ; सुनील बन्सी मोरे यांनी दिली आहे.यावेळी मुंबईतील रिपब्लिकन वरिष्ठ नेत्यांसह रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे;अजित रणदिवे;रमेश गायकवाड; संजय पवार; प्रकाश जाधव आदी जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
