शिबलापूर-गुहा फाटा रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

Cityline Media
0
संगमनेर–अहिल्यानगर ४० कि.मी प्रवास जीव धोक्यात!

आश्वी संजय गायकवाड अहमदनगर जिल्ह्यातील शिबलापुर–गुहा फाटा हा फक्त २० कि.मीचा रस्ता असला तरी त्यावरून प्रवास करणे म्हणजे २० किमी नव्हे तर २०० कि.मीचा मृत्यूचा प्रवास वाटावा अशी अवस्था झाली आहे.या मार्गावरून थेट संगमनेर–नगर ४० किमीचं अंतर पार करणाऱ्या प्रवाशांचा जीव अक्षरशः मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे.
पावसामुळे खड्डे पाण्याने भरले आहेत.त्यात डांबर उखडल्याने काही खड्ड्यांची खोली वाढली आहेत की कार,जीप,ट्रॅक्टर देखील अडकतात. दोनचाकी वाहनं तर घसरून थेट अपघाताला आमंत्रण देतात. रस्त्यावरून जाणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितलं – “दररोज शाळेत जायचंय की मृत्यूला भेटायला निघायचंय, हेच समजत नाही.”
एवढंच नव्हे तर आपत्कालीन सेवा देखील विस्कळीत झाल्या आहेत. रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेत पोहोचत नाही.एखाद्या गंभीर अपघाताच्या ठिकाणी पोहोचताना वेळ गेल्याने जीव धोक्यात जातो.हा रस्त्यावरून प्रवास म्हणजे जीव वाचवायचा की संपवायचा,हा प्रश्नच नागरिकांना पडला आहे.
 याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा वेड्या बाभळीच्या काटेरी फांद्या, झुडुपं आणि इतर झाडांनी रस्ता गिळून टाकला आहे. साईट पट्ट्यांवर झाडं आल्याने वाहनचालकांना बाजूला जाणं अशक्य झालं आहे.अनेकदा ट्रॅक्टर,जीप किंवा अवजड वाहने आल्यावर समोरच्या वाहनाला धोकादायक रित्या मागे घ्यावं लागते.प्रवाशांनी तक्रार केली की – “खड्ड्यांपासून वाचावं की काट्यांपासून? हा प्रश्न आम्हाला सतत पडत असतो
 शिबलापुर–गुहा हा रस्ता देवगाव जाखुरी, पिंपरणे, कनोली,ओझर, शेडगाव, हंगेवाडी,मालुजे,पानोडी, आश्वी दाढ,खुर्द, पिंप्री खळी,झरेकाठी, चनेगाव,निंभेरे,तांभेरे, सोनगाव, आनपवाडी अशा तब्बल ४० गावांचा मुख्य शिरा आहे.हजारो शालेय विद्यार्थी,शेतकरी, कामगार आणि व्यावसायिक दररोज या मार्गावरून प्रवास करत दळणवळण करतात मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे मुलांच्या शिक्षणावर, शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीवर आणि सामान्य जनतेच्या रोजच्या जगण्यावर घाला बसला आहे.
नागरिकांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अजून फक्त आश्वासने मिळत आहेत.त्यामुळे ग्रामस्थ संतप्त असून,आता प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त न केल्यास जनतेचा प्रचंड रोष उसळेल आणि तीव्र आंदोलनाचा भडका उडेल,असा इशारा येथील संतप्त नागरिकांनी दिला आहे.
- २० किमीचा रस्ता – २० हजारांचा त्रास!
-खड्डे की काटे? प्रवाशांना रोजचा प्रश्न!
 -४० गावं अडकली, प्रशासन डोळेझाक करतंय! शिबलापुर–गुहा रस्ता की मृत्यूचा महामार्ग?
 प्रशासनाला थेट सवाल – अजून किती अपघात,किती जीव आणि किती आंदोलने झाल्यावर हा रस्ता दुरुस्त होणार?
तात्काळ खड्डे बुजवून डांबरीकरण न झाल्यास जनता रस्त्यावर उतरेल आणि या दुर्लक्षाची किंमत शासनाला चुकवावी लागेल असे येथे निर्माण होताना दिसते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा यांना निवेदन देणार 
गुहा फाटा शिबलापुर या रस्त्यावरिल सुमारे ४० गांवचा हा रस्ता जिव्हाळ्याचा विषय असुन हा प्रश्न राज्याचे जलसंपदा विभागाचे मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांना लवकरच भेट घेऊन निवेदन देणार आहे ते निश्चित मार्ग काढतील.
सोमनाथ डोळे
बुथ प्रमुख भाजपा झरेकाठी
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!