नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील वणी येथे बोरीच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त कारण्यात यत आहे.याबाबत वणी पेोलिसांत असमात मृत्यूची नॉद करण्यात आली आहे.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,नवनाथ मोहन गायकवाड (२०) रा.मु.चारोसे, पो. वणी खुर्द ता. दिंडोरी या तरुणाने चारोसे शिवारात मळ्यात बोरीच्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.त्यास वणी ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याचाबतची खबर वणी पोलिसात आण्णा सोनिराम गायकवाड यांनी दिली असून अधिक तपास वणी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महाले करीत आहे.
