आश्वी संजय गायकवाड संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी व शासनाच्या वतीन ज्ञानेश्वर माऊलींचा ७५० वा जयंती सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवार दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी एकाच वेळी सांयकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत होणार आहे
त्याच अनुषंगाने आश्वी खुर्द गावातही माऊलींच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक प्रवचन व त्यानंतर महाप्रसाद भोजन करण्याचा निर्णय आश्वी खुर्द येथील विठ्ठल मंदिरात आयोजित केलेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला आसल्याची माहिती आश्वी खुर्द दुध संस्थेचे अध्यक्ष मकरंद गुणे यांनी दिली.
या बैठकीत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे संचालक बाळासाहेब मांढरे डॉ. दिनकर गायकवाड सेवा सोसायटीचे मा.अध्यक्ष ज्ञानेश्वर खर्डे, उपाध्यक्ष सुनिल भवर मा. सरपंच म्हाळु गायकवाड मा. उपसरपंच सुनिल मांढरे संजय गायकवाड दुध संस्थेचे उपाध्यक्ष.अविनाश सोनवणे
कैलास गायकवाड सेवा सोसायटीचे संचालक राजेंद्र मांढरे दत्ता गायकवाड भास्कर वाल्हेकर शिवाजी शिदे संजय देशमुख दिलीप मांढरे संपत गायकवाड संतोष भडकवाड रमेश सिनारे विजय गायकवाड सुनिल मांढरे बंडु मांढरे यशवंत वाल्हेकर सुभाष वाल्हेकर साई मांढरे जगदिश सोनवणे जगदिश मुन्तोडे रामनाथ क्षिरसागर बाळासाहेब खर्डे विठ्ठल वर्पे भाऊसाहेब गाडे उमेश सालकर मोहीत गायकवाड सोपान सोनवणे संजय भोसले विठ्ठल गायकवाड बाळासाहेब गायकवाड नामदेव शिंदे बादशाह दातीर रामराव भोसले सचिन महाराज गायकवाड डॉ.सचिन क्षिरसागर सुनिल गायकवाड महेश गायकवाड देवराम शिंदे रमेश कुऱ्हाडे शब्बीर तांबोळी जमाल सय्यद आदीसह मोठ्या प्रमाणात भजनी मंडळ जेष्ठ पदाधिकारी तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मकरंद गुणे यांनी सांगितले की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० जयंती सोहळा आळंदी संस्थान संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी आयोजन केले असून आपल्या गावातही जयंती सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यात प्रथम ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची आतिषबाजी सह मिरवणुक भजन त्यांनंतर प्रवचन तसेच खिचडी महाप्रसादाने समारोप करण्यात येणार आहे या कार्यक्रमास भाविक ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले.