राहाता प्नतिनिधी महसूल दिनाचे औचित्य साधून विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महसूल सप्ताहाचा शुभारंंभ राहाता येथे पार पडला.
यापूर्वी फक्त एकच दिवस महसूल दिन साजरा करण्यात येत होता.राज्यात महसूल मंत्री म्हणून काम करताना महसूल सप्ताह आणि महसूल पंधरवडा उपक्रमाची सुरूवात केली. विद्यमान महसूल मंत्री चंद्रखेर बावनकुळे यांनी ही परंपरा सुरू ठेवली, याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
महसूल सप्ताहाच्या माध्यमातून विभागाकडे प्रलंबित असलेल्या नागरीकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सहकार्य होते. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी गती मिळते.
महसूल विभाग जनतेच्या सर्वच विषयांशी संबंधित असा विभाग असल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलपणे काम करण्याचे आवाहन केले. शासकीय दाखल्याचे वितरण लाभार्थीना करण्यात आले महसूल अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री मा.मंत्री अण्णासाहेब म्हस्के,अतिरीक्त जिल्हाधिकारी. बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी. माणिकराव आहेर, तहसीलदार. अमोल मोरे यांच्यासह विभागाचे अधिकारी कर्मचारी लाभार्थी याप्रसंगी उपस्थित होते.