वणीच्या संस्कृतीनगर येथे नव्याने बांधलेल्या मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील वणी येथील किर्तीनगर येथे नव्याने बांधलेल्या श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा श्रावणातील तिसऱ्या सोमवारचे औचित्य साधून उत्साहात झाला.
वणी नाशिक मार्गावरील येथील संस्कृतीनगर येथील शिवभक्त व ग्रामस्थांनी नव्याने श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर बांधले असून शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशरोहर कार्यक्रमास पुरोहितांच्या मंत्रघोषात उत्साहात सुरुवात झाली होती. फुल माळांनी सजवलेल्या वाहनात नर्मदेश्वर शिवलिंगाची मूर्ती व मंदिराच्य कलशाची डिजेवरील शिवभक्ती गीताच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली होती.त्यानंतर महोदव प्राणप्रतिष्छ विधी दरम्यान प्रायश्चित कर्म, प्रधान संकल्प, पंचांगकर्म, देवी देवता मंडल

आव्हान स्थापना, ब्राम्हण पुजन, कुटीर होम, सायम पूजन, होम, आरती आदी कार्यक्रम पार पडले. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी सप्तशृंगी गडावरील जय गुरुदेव आश्रमातील महंत दयानंद सरस्वती, स्वरुपानंद सरस्वती व प्रति जेजुरी पाचेरेवणी येथील प्रतिजेजुरी देवस्थानचे महंत योगेश महाराज गवारे यांचे हस्ते शिवलिंग मूर्ती स्थापना, प्रतिष्ठाहोम, प्रतिष्ठा कर्म मंडल,

उत्तरांग हवन, कलश स्थापना, ध्वज स्थापना, पुर्णाहुती, महाआरती आदी कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी भाविकांना फराळाचे वाटप तर सायंकाळी महाप्रसाद आदी कार्यक्रम होवून प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम झाला. प्राणप्रतिष्ठा कार्यक्र मानंतर भाविकांनी दर्शनासाठी व पुजा विधीसाठी गर्दी केली होती. कार्यक्रमांचे आयोजन किर्तीनगर मित्र मंडळ व ग्रामस्थांनी केले होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!