निपाणी वडगावच्या मालवीय वाडी जवळील बोगदा पावसाच्या पाण्याने तुडुंब

Cityline Media
0
रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार

श्रीरामपूर दिपक कदम शहरातील अशोकनगर लगत असणाऱ्या निपाणी वडगाव येथील मालवीयवाडी या ठिकाणी जाण्या-येण्याकरता रेल्वे प्रशासनाची चौकी होती. परंतु ती चौकी (चौकी क्रमांक ४६-ए) रेल्वे प्रशासनाने बंद करून त्या ठिकाणी अंडरग्राउंड रेल्वेचा बोगदा तयार केला आहे. त्या बोगद्याद्वारे नागरिक,शालेय व महाविद्यालयाला येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.येत्या दिवसात जोरदार पाऊस पडल्यामुळे त्यात पाटाला येणाऱ्या पाण्यामुळे हा बोगद्या तुडुंब भरला आहे.असेच वेळोवेळी हा बोगदा पाटाला पाणी आल्यावर संपूर्णपणे भरून जात असल्याने नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना या बोगद्यातून प्रवास करता येणे शक्य होत नाही.

या बोगदाची तक्रार अनेक नागरिकांनी या अगोदर रेल्वे प्रशासनाला केलेली आहे.परंतु अद्याप पर्यंत त्या रेल्वे प्रशासनाने या बोगद्याचे संपूर्ण पणे पूर्ण काम केलेले नसून त्या बोगद्याचे सर्व काम अर्धवटपणे करून तो बोगदा रेल्वे प्रशासनाने सोडून दिला आहे.त्यामुळे अनेक नागरिकांचे येण्या जाण्याचे फार हाल होत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये या बोगद्यामध्ये शेवाळ साचल्याने खूप जणांचे अपघात झाले आहेत.विद्यार्थ्यांना या बोगद्यातून कमरे इतक्या पाण्यातून शाळेमध्ये जावे व यावे लागत आहे.या बोगद्याच्या कडेला पाणी जाण्याकरता ज्या नाल्या केलेल्या आहेत त्या नाल्या सुद्धा भरलेल्या पाण्यामुळे दिसून न आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांचे अपघात होत आहेत.

अजून कुठपर्यंत नागरिकांनी या बोगद्याच्या यातना सहन कराव्या असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे.या विषयी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करून देखील रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. हा बोगदा असून अडचण व नसून खोळबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे अनेक नागरिक व शालेय विद्यार्थी, कॉलेज विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.या अगोदर सुद्धा ग्रामपंचायत निपाणी वडगाव यांनी या बोगद्याची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे केली होती. परंतु तरी देखील रेल्वे प्रशासन या गोष्टीकडे  लक्ष देत नसून या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष रेल्वे प्रशासन का करीत आहेत ? हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे 

या बोगद्या संदर्भात कोळसे वस्ती, रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक,ओहोळ वस्ती व मालवीयवाडी परिसरातील अनेक वस्त्या मधील नागरिक संतप्त झाले आहेत.या बोगद्याचे पाणी उपसणारे ठेकेदार,काम करणारे ठेकेदार या सर्वांना नागरिकांनी फोन केला असता हे सर्व ठेकेदार उडवा उडवीची उत्तरे देतात.

नागरिकांच्या कुठल्याच समस्या ते ऐकून घेत नसल्याचे दिसून येत आहे.तरी रेल्वे प्रशासनाने या ठेकेदारावर कडक कारवाई करून दुसरे ठेकेदार नेमावेत यासाठी नागरिक रेल्वे मंत्रालयाकडे निवेदनाद्वारे स्वतःजाऊन मागणी करणार आहेत.या संदर्भात अनेक त्रस्त नागरिक,विद्यार्थी,विद्यार्थिनी हे रेल्वे प्रशासनाची लवकरच भेट घेणार आहेत.

जोपर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून रेल्वेची चौकी पूर्ववत चालू करण्यात यावी अशी ही मागणी नागरिकांनी केली आहे.या बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही तर याविषयी तीव्र आंदोलन देखील करणार असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!