भारतीय जनता पक्षाचे नेते विनायक देशमुख यांचे मत
अहिल्यानगर: प्रतिनिधी आतापर्यंतच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जे जमले नाही ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पा.या जोड गोळीने करून दाखविले. मराठा समाजाच्या दृष्टीने ही अत्यंत क्रांतिकारक घटना आहे." अशी प्रतिक्रिया भाजप नेते व अहिल्यानगर जिल्ह्याच्या मराठा सेवा संघाचे प्रथम (संस्थापक) अध्यक्ष विनायक देशमुख यांनी व्यक्त केली. छाया रेखांकन प्रकाश कदम
यासंदर्भात अधिक बोलताना श्री. देशमुख म्हणाले, " आतापर्यंत राज्याचे नेतृत्व अनेक बलाढ्य मराठा नेत्यांनी केले .मात्र मराठा समाजाच्या "नियमानुसार आरक्षणाच्या" मागणीवर कुणीही उपाय काढू शकले नव्हते.मुख्यता इतर समाजाच्या प्रामुख्याने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणे, हे मोठे आव्हानात्मक काम होते. एका बाजूला मराठा समाजाचे नेते. मनोज जरांगे पा.यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला दिवसेंदिवस मोठा आणि वाढता प्रतिसाद मिळत असतानाच दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज देखील संघर्षाच्या भूमिकेमध्ये उभा राहिला होता.महाराष्ट्रातील समाजवीण उसवली जाते की काय ?,अशी भीती व्यक्त होऊ लागली होती.मात्र या अत्यंत नाजूक स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पा. यांची नियुक्ती करून एक अत्यंत परिपक्व निर्णय घेतला.त्यानंतर श्री. विखे पा.यांनी समाजातील सर्व अभ्यासक,नेते ,कायदे तज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि विविध घटकांना एकत्र करून सलग चार दिवस या विषयाचा पाठपुरावा केला.मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी सातत्याने विचार विनिमय करून राधाकृष्ण विखे पा. यांनी सर्व समावेशक व ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावणारा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावामुळे मनोज जरांगे यांच्या बहुतांश मागण्या कायद्याच्या चौकटीत टिकतील, अशा पद्धतीने मान्य करण्यात आल्या. हे फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाचे आणि राधाकृष्ण विखे पा. यांच्या संयमीत प्रयत्नांचे मोठे यश आहे,असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, " असे श्री. देशमुख म्हणाले.
" दुर्दैवाने या आंदोलनाच्या काळात विरोधी पक्षांनी राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. आंदोलनाच्या निमित्ताने विरोधकांकडून संकुचित स्वार्थासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनाकारण लक्ष करण्याचाही प्रयत्न झाला.मात्र श्री. फडणवीस यांनी कुठल्याही टिकेकडे लक्ष न देता विखे पा. यांच्या माध्यमातून आरक्षणाच्या विषयावरच आपले लक्ष केंद्रित केले.आणि आपल्या कामातून विरोधकांच्या कुटील डावपेचांना मोठी चपराक दिली."
छाया रेखांकन-प्रकाश कदम
"मराठा समाजातील युवकांनी आता या आरक्षणाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून उच्च शिक्षण घ्यावे व प्रशासनात व अन्य आस्थापनांमध्ये विविध ठिकाणी आपले स्थान निर्माण करावे," अशी अपेक्षा श्री. देशमुख यांनी व्यक्त केली.
" या सर्व प्रक्रियेत अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र राधाकृष्ण विखे पा.यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून या निमित्ताने श्री. विखे पा.हे राज्यातील मराठा समाजाचे एक प्रभावी नेते म्हणून ठळकपणे अधोरेखित झाले.एका अर्थाने सरकारच्या दृष्टीने अत्यंत कठीण प्रसंगी विखे पा.हे "नवे संकटमोचक" म्हणून उदयास आले.विखे पाटील यांच्या या कामाचा अहिल्यानगर जिल्हा वासियांना अभिमान वाटतो," असे मत श्री.देशमुख यांनी व्यक्त केले आहेत.
