-निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मिळावे.
-तालुक्यातील सर्व खड्डेमय रस्ते तात्काळ दुरुस्त करा.
नाशिक दिनकर गायकवाड निफाड तालुक्यातील सतत चार महिन्यापासून पाऊस पडत असल्यामुळे कांदा,मका, सोयाबीन,टोमॅटो इतर भाजीपाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई एक लाख रुपये भरपाई मिळावी तसेच तालुक्यातील खड्डेमय रस्ते दुरुस्त व्हावे यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने निफाड तहसीलदारांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
बहुजन समाज पार्टीचे महासचिव धर्मेंद्र मधूकर जाधव यांनी निफाडचे तहसीलदार तथा दंडाधिकारी अधिकारी विशाल सुरेखा अरुण नाईकवाडे यांना बहुजनदिलेल्या निवेदनात म्हटले आहे की की निफाड तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून झालेल्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना एकरी लाख रुपये मिळावे.
तसेच निफाड तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमयन झाल्यामुळे त्वरित रस्ते दुरुस्ती करावी निफाड तालुक्यातील सतत चार महिन्यापासून पाऊस पडत असल्यामुळे कांदा,मका, सोयाबीन,टोमॅटो इतर भाजीपाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळवावी तसेच निफाड तालुक्यातील सुकेणे, सायखेडा खेरवाडी पिंपळगाव भेंडाळी पालखेड हे प्रमुख रस्ते मोठे खड्डेमय झाल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी खड्डे दुरुस्ती करण्यात यावे अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
