नाशिक दिनकर गायकवाड आडगाव शिवारात दरोडा
टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांपैकी तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले असून,पोलिसांनी एकाच्या ताब्यातून सुमारे सव्वातीन लाख रुपयांचे दरोड्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी मयूर निकम यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आडगाव पोलीस ठाण्याचे पथक रात्रीची गस्त घालत होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास आडगाव शिवारातील वाढवणे कन्स्ट्रक्शन्स अँण्ड इंजिनिअरिंग समोर आरोपी समीर प्रमोद पाटील (वय २९, रा. हनुमाननगर, मलकापूर, जि. बुलढाणा), पवन पाटोळ
(रा. छत्रपती संभाजीनगर) व त्यांचे इतर तीन साथीदार हे जबरी धोरी किंवा दरोडयाची पूर्वतयारी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यावेळी पोलीस पथकाने त्यांच्या ताब्यातून निळ्या रंगाची बॅग, मिरची पावडर, हॅण्डग्लोव्हज, दोरी, चॉपर, लोखंडी फायटर, गावठी कट्टा, एक पितळी काडतूस, सुझुकी कंपनीची मोटारसायकल, टीव्हीएपा कंपनीची अपाची मोटारसायकल असे सुमारे ३ लाख ११ हजार ५०० रुपये किमतीचे दरोडा टाकण्याचे साहित्य त्यांच्या ताब्यात मिळून आले, तसेच त्यांच्या पळून गेलेल्या बार साथीदारांबाबत विचारपूस करता एकाचे नाव पवन पाटोळ (रा. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.
