निळवंडेत २६ सप्टेंबरला महाआरोग्य शिबिराचे आयोजन

Cityline Media
0
संगमनेर प्नतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सेवा पंधरवड्या निमित्त आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सशक्त नारी स्वस्थ परिवार स्वस्थ गाव सशक्त गाव सशक्त भारत अभियानांतर्गत पंचायत समिती संगमनेर,ग्रामपंचायत निळवंडे,बाबा पॅटर्न जनसेवा कार्यालय निळवंडे,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निळवंडे यांचे संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय निळवंडे येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
             छाया रेखांकन-प्रकाश कदम 
या शिबिरामध्ये निळवंडे आणि निळवंडे परिसरातील सर्व महिला भगिनी व ग्रामस्थ यांची मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासण्या करण्यात येणार आहे.तसेच आभा कार्ड,आयुष्यमान कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा.आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्डसाठी आधारकार्ड,मोबाईल नंबर, कार्ड काढण्यासाठी घरातील व्यक्तींचे फोटो बरोबर घेऊन यावे.तरी निळवंडे आणि निळवंडे परिसरातील सर्व नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत निळवंडे,बाबा पॅटर्न जनसेवा कार्यालय निळवंडे,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निळवंडे यांच्या वतीने करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!