नाशिक प्रतिनिधी नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान नाशिक व मालेगाव शहरातील रस्ते वाहतूक आणि रस्ते विकास कामांसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. व संबंधित विकास कामे जलद गतीने पूर्ण व्हावी अशी मागणी व्यक्त केली.
शहरातील वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी खालील महत्त्वपूर्ण रस्ते विकास प्रकल्पांकडे गडकरी यांचे लक्ष वेधले.की
१.राष्ट्रीय महामार्ग-६० वरील पाटणे फाटा येथून सुरू होऊन राष्ट्रीय महामार्ग-१६० एच वरील वडगाव जंक्शन येथे अंदाजे २२ किमी लांबीचा एक व्यापक बायपास मंजूर करणे.
२. मालेगाव शहराच्या हद्दीत वाढत्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करणे.
३. चाळीसगाव फाटा (चौ. ३०५) येथील सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या रचनेबाबत.
४. झोडगे येथील उड्डाणपुलाचे बांधकाम.
५. चंदनपूरी येथील उड्डाणपुलाचे बांधकाम.
६. सेवा मार्गाचे त्वरित अपग्रेडेशन आणि रुंदीकरण.
या सर्व विषयांवर झालेल्या चर्चेला मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या विकास प्रकल्पांच्या मंजुरी व अंमलबजावणीमुळे मालेगाव शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल, व्यापारी व उद्योग क्षेत्रांना जलद व सुरक्षित संपर्क मिळेल, तसेच नागरिकांचा प्रवास वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. यामुळे मालेगाव शहराचा सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळणार आहे.असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
