गुहावटीवरुन ज्योत आणणाऱ्या युवकांची अध्यात्मिक भावना मोठी-डॉ.सुजय विखे

Cityline Media
0


झरेकाठी सोमनाथ डोळे गुवाहाटी (आसाम) येथून तब्बल ३,४०० किलोमीटर अंतर पायी  ज्योत आणणाऱ्या वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकांचा मा. खासदार डॉ.सुजय विखे पा.यांनी एकरूखे येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात गौरव केला. “हा पराक्रम अभूतपूर्व असून या उपक्रमागची अध्यात्मिक भावना मोठी असल्याचे या युवकांनी सिद्ध केले आहे,असल्याचे भाविकांशी संवाद साधताना सांगितले.
राहाता एकरूखे येथे वज्रेश्वरी प्रतिष्ठान आयोजित मशाल पदयात्रेचे आगमन होताच ग्रामस्थ व भाविकांनी उत्साहात स्वागत केले. या वेळी मा. खासदार डॉ. सुजय विखे पा. यांनी मनोभावे दर्शन घेऊन पदयात्रेत सहभागी झालेल्या युवकांचा विशेष गौरव केला. त्यावेळी ते बोलत होते 

डॉ विखे भाविकांशी संवाद साधत म्हणाले की,नेते मोठे नसतात,अनेक येतात-जातात परंतु कार्यकर्त्यांच्या जिद्दीमुळेच खरी ओळख निर्माण होते. विखे पाटील कुटुंबाची ओळख टिकून आहे कारण अशा कार्यकर्त्यांचा मजबूत पाया मागे उभा आहे.

पदयात्रेचा कठीण प्रवास, दरम्यान आलेल्या अडचणी, मुसळधार पावसाच्या संकटांनंतरही युवकांनी हा पराक्रम साध्य केला याबद्दल त्यांनी मनापासून कौतुक केले. हा पराक्रम फक्त वज्रेश्वरी मातेसह देवतेच्या कृपेने आणि युवकांच्या चिकाटीने शक्य झाला आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने या युवकांचा आदर्श घेतला तर अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. विखे पाटील यांनी अलीकडील पुरामुळे बाधित शेतकऱ्यांचा उल्लेख करत, लवकरच शासनाचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा केले जाईल. राजकारणासाठी मत मागणारे अनेक येतात,पण संकटाच्या काळात खऱ्या अर्थाने सोबत उभे राहणे ही विखे पाटील कुटुंबाची परंपरा आहे,” असे आश्वासन दिले.

कार्यक्रमा दरम्यान ट्रस्टतर्फे डॉ. सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुवाहाटी येथून मशाल ज्योत घेऊन आलेल्या वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकांचा सन्मानही त्यांच्या हस्ते पार पडला

या सोहळ्याला भाविक, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून वज्रेश्वरी मातेसमोर भावपूर्ण दर्शन घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!