एटीएसची धडक कारवाई झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी संयुक्तप कोंढवा परिसरात दहशतवादी संधान संशयावरून केलेल्या कारवाईत आतापर्यंत किमा १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनुसार,कोंड्या,खडी,खडक,वानवडी आणि भोसरी यासह पुण्यातील सुमारे २० ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली.देशविरोधी कृत्यांच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.पुणे पोलिसांचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,या मोठ्या कारवाईसाठी एटीएसचे २०० कर्मचारी आणि पुणे पोलिसांचे सुमारे ५०० अधिकारी तैनात करण्यात आले होते.
या छापेमारी दरम्यान,अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.अधिकाऱ्यांनी सांगितले की,ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षेशी यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून असे सुरक्षेच्या कारणास्तव,या कारवाई बाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
कारवाई संबंधित अत्यंत संवेदनशिल तपास भाग आहे. पुढील कारवाई गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ही कारवाई कोथन येथील एका आधीच्या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. या तपास दरम्यान व व्यक्तींना अटक करण्यात आली होती,ज्यांचे दहशतवादी संधान असल्याचे नंतर उघड झाले. त्यांच्या चौकशी पुणे मॉड्यूल नावाच्या दहशतवादी गटाची माहिती सम आली,ज्यामुळे ही नवीन कारवाई करण्यात आली.
