आरोग्यदायी दिवाळीत खबरदारी घ्या-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मोरे

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड नाशकात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे दूषित झालेले जलसाठे आणि दिवाळी सारख्या सणामुळे खाद्य‌ पदार्थां मधून होणाऱ्या भेसळीचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी आरोग्य यंत्रणांना अधिक सतर्क राहून दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश
डॉ. मोरे यांनी ग्रामीण भागात दूषित झालेल्या पाणी साठ्यांचे व स्रोतांचे नमुने तातडीने तपासण्याचे
निर्देश दिले.गावोगावी पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासावेत.तसेच नैमित्तीक संसर्ग उद्रेकांबाबत खबरदारी घेऊन नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विशेष म्हणजे दीपावली सुट्टीच्या काळात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. मनःशक्ती प्रशिक्षण आणि पाणी गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र,या बैठकीत मनःशक्ती प्रयोग लोणावळा यांच्या माध्यमातून सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचे 'मनःशक्ती प्रशिक्षण' घेण्यात आले.

याशिवाय, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन आणि आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्त्रोतांची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत
आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत १३८४ ग्रामपंचायतींमधील जलस्त्रोतांची पाहणी करून पाण्याची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे.

तसेच, सर्व आश्रम शाळांतील पाणी पुरवठा योजनांचे सर्वेक्षण करून दूषित पाणी पुरवठा होणार नाही, याची समिक्षा करण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले.
विविध आरोग्य कार्यक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

या बैठकीत वातावरणीय बदल, बालमृत्यू, माता मृत्यू, ॲनिमिया मुक्त भारत, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम, नियमित लसीकरण, खक्खझ, क्चखड, पाणी गुणवत्ता, कुटुंब नियोजन,एच डब्लुसी एचबीएनसी, एच बी वायसी, आशा पोर्टल,आयुष,कायाकल्प आणि एन  क्यू ए एस, एन एच एम टू वित्त, ई-औषधी, ई-संजीवनी, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, सिकलसेल, गोवर, रुबेला लसीकरण, आयुष्मान भारत डिजिटल मिशन, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अभियान, एचआयव्ही एड्स नियंत्रण अभियान, गर्भलिंग निदान विरोधी अभियान, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, तसेच इतर सर्व महत्त्वाच्या आरोग्य विषयक कार्यक्रमांचा बारकाईने आढावा घेण्यात आला.

या सभेस जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, डॉ. युवराज देवरे, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा समन्वयक तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!