स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती घेत कारवाई करणेबाबत नुकतेच आदेश दिलेले आहेत या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगरासह नेवासा येथे तेरा गोवंशीय जनावरांची सुटका; दोनशे किलो गोमांस जप्त केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरिक्षक दिपक मेढे व पोलीस अंमलदार सुनिल पवार, शाहिद शेख, शाहिद शेख, विष्णु भागवत,अतुल लोटके,गणेश धोत्रे,दिपक घाटकर,पंकज व्यवहारे, सोमनाथ झांबरे, भाऊसाहेब काळे,सागर ससाणे, सतिष भवर,चालक भगवान धुळे, उमाकांत गावडे यांचे दोन पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
या पथकाने नुकतेच अहिल्यानगर शहरामध्ये व नेवासा या ठिकाणी जावुन माहिती काढुन गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणाची माहिती घेतली मिळालेल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम आरोपींचे नांव पत्ता जप्त मुद्देमाल १) कोतवाली ९२३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५ ३(५)महा. पशुसंरक्षण अधिनियम क. ५(अ)(ब)(क), ९ प्रमाणे १) इरफान फारुक कुरेशी वय- ३४ वर्षे
२) शकील बाबासाहेब कुरेशी वय- ३५ वर्षे दोघे रा. बेपारी मोहल्ला झेंडीगेट,अहिल्यानगर ६०,२०० रुपये कि.चे २०० किलो गोमांस व
लोखंडी सुरा २ नेवासा ८८३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम महा. पशुसंरक्षण अधिनियम क. ५(अ)(ब) ९ सह प्राण्यांना निर्धयतेने वागविण्यास प्रतिबंध ९, ११ प्रमाणे १) मुजाहिद अमिर शेख
२) मोहसिन शब्बीर शेख दोघे रा. सलाबतपुर ता. नेवासा
१,४५००० रुपये कि.चे एकुण १३ जिवंत गोवंश जातीचे जनावरे एकुण ०२ ०४ २,०५,२००
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
