डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करा;तपास सीबीआय कडे सोपवा

Cityline Media
0
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेचे विविध मागण्याचे निवेदन सादर

सातारा सिटीलाईन न्यूज नेटवर्क राज्यातील बहु चर्चित डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून तपास निष्पक्षपाती होण्यासाठी सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा याबद्दल अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याशी चर्चा केली.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील महीला वैद्यकीय अधिकारी डॉ.संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. याबद्दल नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते व ॲड.अमोल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या निवेदनात मागण्या करण्यात आल्या की १) पी.एस.आय गोपाळ बदणे २) प्रशांत बनकर सर्व आरोपींना तात्काळ अटक करा आरोपींना फरार करण्यासाठी पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांना सह आरोपी करा. आरोपी अटक झाल्यानंतर पळून जाण्याच्या मार्गाचा व अटक केले पर्यंतचा सर्व प्रवास तपास दोन शासकीय पंचनामा करून करावा.

२) हा तपास निष्पक्षपाती होण्यासाठी सीबीआयकडे वर्ग करावा. या गुन्ह्यातील आरोपी स्वतः फलटण शहर पोलीस ठाणे मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर अधिकारी असल्याने तपासामध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा तपास सीबीआय कडे वर्ग करण्याचा प्रस्ताव तात्काळ पोलीस अधीक्षक यांनी राज्य शासनाकडे सादर करावा.

३) घटनास्थळाचे निरीक्षण फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून करण्यात यावे. घटनास्थळ पंचनामा हा व्हिडिओ रेकॉर्डिंग द्वारे करण्यात यावा. सर्व प्रकारचे परिस्थितीजन्य पुरावे तात्काळ घेण्यात यावेत.

४) या गुन्ह्यामध्ये फक्त आत्महत्येचा कलम लावण्यात आलेला आहे. मयत डॉक्टर संपदा मुंडे यांनी हातावरती लिहिलेल्या मजकुराप्रमाणे आरोपी ने चार वेळा त्यांच्यावर बलात्कार केला आहे असे नमूद आहे त्या अनुषंगाने बलात्काराचे कलम देखील तात्काळ वाढविण्यात यावे. बदणे यांनी महिला वैद्यकीय अधिकारी यांच्यावरती कुठे बलात्कार केले होते.कितीवेळा बलात्कार केले होते. बलात्कार करताना पीएसआय बदने यास कुणी मदत केली होती. याबाबतची सखोल चौकशी करण्यात यावी.अन्यथा आरोपींना अटक झाली तरी देखील लागलीच जामीन मिळेल आणि गुन्ह्याची संवेदनशीलता व तीव्रता कमी होईल त्या अनुषंगाने तात्काळ बलात्काराची कलमे वाढविण्यात यावीत. पीएसआय बदने व ईतर आरोपींच्या नार्को टेस्ट,ब्रेन मॅपिंग टेस्ट व इतर टेस्ट करण्यात याव्यात. जेणेकरून सर्व सत्य समोर येईल.

५) मयत आरोपी संबंधित संशयित यांचे घटना घडण्याचे अगोदर सहा महिन्यांचे सी डी आर ए एस डी आर ए व व्हाट्सअप चॅट सोशल मीडिया चॅट काढावेत आरोपींनी सर्व पुरावे नष्ट करण्याचे अनुषंगाने मल्टीमीडिया व मोबाईल मधील पुरावे नष्ट केल्या असावेत त्या अनुषंगाने त्यांचे मोबाईल जप्त करून डिलीट केलेले सर्व पुरावे विहित मार्गाने घ्यावेत तसेच मयताच्या मोबाईल मधील देखील सर्व पुरावे विहित मार्गाने तात्काळ घेण्यात यावेत.

६) मयत डॉक्टर मुंडे यांनी यापूर्वी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल केलेले सर्व अर्ज तपासात घ्यावीत या अर्जांची योग्य दखल न घेणाऱ्यांवर कारवाई करावी. व त्या अर्जांमधील उल्लेखित केलेल्या इसमांना सह आरोपी करण्यात यावे व अटक करून पुढील तपास करण्यात यावा.

७) मयत डॉक्टर मुंडे यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील व सिव्हिल सर्जन सातारा यांच्याकडे त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत तोंडी लेखी तक्रार दिली होती का याबाबत तपासामध्ये चौकशी करण्यात यावी तपास टिपणे घेण्यात यावीत व तपासामध्ये सर्व कागदपत्र समाविष्ट करण्यात यावीत.

८) आरोपी पीएसआय मदने व त्याचे सहकारी हे महिला वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांचे वर शवविच्छेदन करतेवेळी दबाव आणत असत. आणि हवा असा रिपोर्ट व अहवालामध्ये त्यांना हवे असलेले बदल करून घेण्यासाठी दबाव टाकत होते याबाबत मयत डॉक्टर संपदा मुंडे यांनी आजपर्यंत उपजिल्हा फलटण रुग्णालयामध्ये केलेले सर्व शवविच्छेदन अहवाल तपासावेत. तसेच त्यांनी एमएलसी आल्यानंतर रुग्णांवर व अत्याचार पिढीतांवर केलेले उपचार व दिलेली एम.एल.सी रिपोर्ट मेडिकल रिपोर्ट ची सखोल चौकशी करण्यात यावी. कारण या मधून सर्व महत्वपूर्ण पुरावे उलगडणार आहेत. किती व कोणते गुन्हे दाबण्यासाठी आरोपी पीएसआय बदने व त्याचे सहकारी कुणाच्या सांगण्यावरून महिला वैद्यकीय अधिकारी श्री संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणत होते हे सर्व स्पष्ट होईल.

९)या गुन्ह्यासाठी सर्व प्रकारच्या पंचनाम्यानमधील पंच हे फक्त शासकीयच घेण्यात यावेत तसेच निमशासकीय व मानधनतत्त्वावरील पंच घेण्यात येऊ नयेत. शक्यतो हे सर्व पंच देखील फलटण तालुक्याच्या बाहेरील शासकीय सेवेतील घेण्यात यावेत.

१०) या गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह 
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी दोषी असल्यास कारवाई करण्यात यावी.

११) हा गुन्हा फास्टट्रॅक जलदगती न्यायालयात (कोर्टात) चालवण्याचे आदेश तात्काळ मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी द्यावेत.

१२) या गुन्ह्यात तात्काळ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी. विशेष सरकारी वकिलांच्या मदतीकरितादेखील सहाय्यक विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी. याबाबतचे आदेश मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ द्यावेत.

१३) या गुन्ह्यात तपासाच्या प्रगतीबाबत तपासी अधिकारी व पोलीस अधीक्षक सातारा यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व अपडेट माहिती वेळोवेळी प्रसार माध्यमांना व महाराष्ट्रातील जनतेला दिली पाहिजे यावर कार्यवाही करावी.

१४) फलटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी राजकीय दबावात काम करत असून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर राजकीय वजनदार व्यक्तींचा प्रचंड दबाव असल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगाने 
मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना भयमुक्त वातावरणामध्ये विना दबावांमध्ये काम करण्याकरिता प्रोत्साहन दिले पाहिजे.
अशा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!