नाशिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांवर ‌राजकिय व्देषापोटी गुन्हे दाखल

Cityline Media
0
पक्षाच्या बैठकीत काकासाहेब खंबाळकर यांचा आरोप 

नाशिक दिनकर गायकवाड आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून सज्ज राहावे,असे आवाहन पक्ष निरीक्षक काकासाहेब खंबाळकर यांनी केले.नाशिकमध्ये राजकीय द्वेषापोटी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रसंगी पक्षाचे कायदेशीर सल्लागार बी. के. बर्वे म्हणाले की, दाखल गुन्ह्यांसदर्भात आम्ही कायदेशीर लढा लढत आहोत.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रविवारी दुपारी पार पडली.व्यासपीठावर पक्षाचे कायदेशीर सल्लागार ॲड.बी. के. बर्वे, राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव उपस्थित होते.

मा. नगरसेवक संजय भालेराव, दीक्षा लोंढे, पवन क्षीरसागर, रामबाबा पठारे, आकाश भालेराव,महिला आघाडीच्या माधुरी भोळे,नयना वाघ, आदींनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष भारत निकम यांनी केले. बैठकीस युवक पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांच्या दोधा मुलांवर गोळीबार व खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यांसदर्भात बाजू मांडण्यासाठी पोलिस आयुक्तांची गुरुवारी (दि. ३०) भेट घेण्यात येणार असून त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

यासाठी पदाधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजता शालीमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जमावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, नाशिकरोड अध्यक्ष समीर शेख उपाध्यक्ष राजाभाऊ वानखेडे,चंद्रकांत भालेराव,संतोष पाटील,दिलीप नरवाडे,नारायण गायकवाड विनोद जाधव, राजाभाऊ अहिरे,विश्वनाथ काळे, आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!