डिग्रस येथे शाळकरी मुलीवर नरभक्षक बिबट्याचा हल्ला

Cityline Media
0
आठ तासांच्या मोहिमेनंतर बिबट्या अखेर जेरबंद;परिसरात सुटकेचा नि:श्वास 

आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांनी अक्षरशःथैमान घातले असून शनिवारी सकाळी डिग्रस येथे शाळेत निघालेल्या इयत्ता ९ वी च्या विद्यार्थिनीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कु. प्रगती सखाराम श्रीराम (वय १४) हिच्यावर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
प्राप्त माहितीनुसार, कु.प्रगती ही डिग्रस येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून नेहमीप्रमाणे ती शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शाळेत जात होती. ती लिंब फाटा येथे पोहोचताच भक्ष्याच्या शोधत झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक झेप घेतली अभावितपणे घडलेल्या या घटनेत कु.प्रगतीला गळा व मानेला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या.तिचा आरडाओरड ऐकून येथील देवराम तुळाजी खेमनर यांनी धैर्य दाखवत घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या तावडीतून तिची सुटका केली.स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड,शिक्षण विस्तार अधिकारी मंगला कलगुंडे-हिरगळ, केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव, सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे सचिव जानकीराम पुणेकर, तसेच मुख्याध्यापक बाचकर,शेख, शिक्षक श्रीपाद पांढरे आदींनी रुग्णालयात भेट देत प्रगतीच्या प्रकृतीची माहिती घेतली.
दरम्यान,हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आठ तासांच्या सतत प्रयत्नांनंतर शनिवारी सायंकाळी बिबट्याला यशस्वीपणे जेरबंद केले.या मोहिमेत वनपाल,वनरक्षक व स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग होता.बिबट्याला पिंजऱ्यात पकडून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

अवघ्या काही दिवसांत याच परिसरात आणखी एका मुलीला बिबट्याने अडवल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात तणाव व भीतीचे वातावरण पसरले होते.मात्र आज झालेल्या यशस्वी पकड मोहिमेनंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी बिबट्याचे दर्शन कायम हि नित्याचीच स्थिती आहे 

स्थानिकांनी धाडसाने मदत केलेल्या देवराम खेमनर यांचे कौतुकाचे सूर उमटत असून, ग्रामस्थांनी वनविभागाला पुढील काळात अधिक सतर्कतेने कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!