नाशिक दिनकर गायकवाड गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी हाती घेतलेल्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या मोहिमेत आता बेशिस्त, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षा चालकांनाही कायद्याचा हिसका दाखवण्यास सुरुवात केली आहे. दिंडोरी नाका या अत्यंत वर्दळीच्या चौकात मनमानीपणे रस्त्यात रिक्षा उभी करणाऱ्या १३ रिक्षा चालकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
रिक्षा व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीने शिरकाव केला असून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये रिक्षा चालकांचा सहभाग उघड झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता गुन्हेगारांना कायद्याचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. रिक्षाचालक प्रसाद वाघ, सुनील जाधव, राहुल लहामगे, गिरीश बाविस्कर, सतीश जाधव, मुरलीधर दांडगे, विकी गिरीटकर, संतोष पगारे, संतोष मोहिते,विशाल माने, योगेश साबळे, अजिंक्य चहाळे,मनोज धुमाळ यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
