नाशिक दिनकर गायकवाड दिवाळी सणाचा शेवटचा दिवस असलेल्या भाऊबीजनिमित्त गुरुवार सकाळपासूनच दिंडोरी शहरासह ग्रामीण भागात वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
ग्रामीण भागातून शहराकडे आणि शहरातून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरू आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे. एस.टी. बसेस पुर्ण क्षमतेने भरल्याने प्रवाशांनी खासगी प्रवासी वाहनांचा पर्याय स्वीकारला आहे.त्यामुळे खासगी वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. प्रवासी संख्या वाढल्याने त्यांचा व्यवसाय तेजीत आहे.
महापालिकेच्या बसेसमध्येही प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली.शहरातील प्रमुख मार्गावर वाहतुकीचा ताण वाढला असून वाहतूक पोलिसांना वाहनचालकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
