युवासेनेच्या वतीने शहर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली मागणी
संगमनेर संपत भोसले नेवासा तालुक्यातील एका विद्यार्थिनीला शहरातील अमृतवाहिनी संस्थेच्या वस्तीगृह प्रशासनाने वेळेत दवाखान्यात दाखल न केल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यात हलगर्जीपणा करणाऱ्या गृहपाल वसतिगृह प्रशासन व संस्था चालकांवर कठोर कारवाई करून विद्यार्थिनीच्या पालकांना न्याय मिळवून,द्यावा अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख सौरभ देशमुख यांनी संगमनेर शहर पोलिसांना निवेदन देऊन केली आहे.
अमृतवाहिनी पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेणारी नेवासा येथील ज्ञानेश्वरी ढेरे ही विद्यार्थिनी गेल्या काही दिवसां पासून आजारी होती.तिने वस्तीगृह कर्मचाऱ्यांना वारंवार दवाखान्यामध्ये जायचे आहे असे सांगून सुद्धा वस्तीगृहपाल व वसतिगृह प्रशासनाने हलगर्जीपणे वागून तिच्या आरोग्याची कोणतीही काळजी घेतली नाही.
तिला वेळीच दवाखान्यात नेले नाही. तसेच उपचार न मिळाल्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली.शेवटी तिने पहाटे स्वतःच्या पालकांना फोन करून परिस्थिती सांगितली. तिचे वडील सकाळी सहा वाजता वस्तीगृहावर पोहोचले.
उपचारासाठी तिला दवाखान्या मध्ये नेत असतानाच दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नाही तर मानवतेला काळीमा फासणारा आहे.कॉलेजमध्ये बाहेरगावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा हा अत्यंत गंभीर प्रश्न असून, या घटनेमुळे शिक्षण संस्थांतील वसतिगृह व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित रेक्टर, वसतिगृह प्रशासन आणि संस्था चालकांवर कठोर कारवाई करून विद्यार्थिनीच्या पालकांना न्याय मिळवून, द्यावा अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख सौरभ देशमुख तालुकाप्रमुख सुशील शेवाळे सार्थक शेवाळे पवन शिरतार भैय्या सातपुते सुयोग जोंधळे समर्थक कटारे मानस साबळे ओंकार राऊत तन्मय नेवासकर यांच्यासह युवा सैनिकांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केले आहे.
