झरेकाठी प्रतिनिधी जोर्वे गटात काँग्रेसला मोठा धक्का
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वाघापूर गावच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा महायुतीचा भगवा फडकवीण्याचा संकल्प करून भाजप मध्ये प्रवेश झाल्याने कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.
संगमनेर तालुक्यातील जोर्वे व परिसरातील नामदार राधाकृष्ण विखे यांच्या विकास कार्याला प्रभावित होऊन व भविष्यात वाघापूर गावाचा विकास होण्यासाठी वाघापूर येथील संगमनेर कारखान्याचे मा.संचालक बाळासाहेब रंगनाथ.शिंदे, मा.उपसरपंच.विनोद घोलप,
अमृत दुध संस्थेचे संचालक.रामभाऊ शिंदे, वाघापूर सोसायटीचे संचालक.साहेबराव शिंदे,वाघापूर सोसायटीचे संचालक.सयराम.रहाणे, शारदा पतसंस्थेचे संचालक.नानासाहेब शिंदे, दिपक पानसरे.बाबासाहेब शिंदे,.संदिप शिंदे तसेच जोर्वे येथील युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष .पंढरीनाथ बलसाने यांनी नामदार.राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत जोर्वे जि.प.गटात महायुतीचा भगवा फडकवण्याचा संकल्प करून भाजप मध्ये प्रवेश केला.
